Monday, 31 August 2020
Sunday, 30 August 2020
Tuesday, 18 August 2020
महाराष्ट्र राज्यात, इनाम व वतने नाहीशी करण्याबाबतचे अधिनियम सुधारणा अध्यादेश
पुणे: महाराष्ट्र
राज्यात, इनाम व वतने नाहीशी करण्याबाबतचे पुढील
अधिनियम अंमलात आहेत :
1. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम (१९५० चा ६०);
2.
महाराष्ट्र
(समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम (१९५३ चा ७०);
3.
महाराष्ट्र
विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत अधिनियम (१९५५
चा २२);
4.
महाराष्ट्र
गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम (१९५९ चा १);
आणि
5.
महाराष्ट्र
मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम १९६२ (१९६२ चा महा. ३५).
२. वरील सर्व अधिनियमांत, इतर गोष्टी बरोबरच, सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता जमिनीचे (महार वतन
जमीन वगळून) हस्तांतरण नियमाधीन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार,
कृषितर प्रयोजनासाठी हस्तांतरित
केलेल्या जमिनी, अनर्जित
उत्पन्न म्हणून जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के इतक्या रकमेव्यतिरिक्त
आणखी अशा अनर्जित उत्पन्नावर पन्नास टक्के इतक्या द्रव्यदंडाचे प्रदान केल्यावर
नियमाधीन करण्यात येतात. अशी रक्कम प्रदान केल्यानंतर,
भोगवटादार,
ती जमीन भोगवटादार वर्ग-एक म्हणून
धारण करतात.
३. राज्यात, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ (२००१ चा महा. २७) (यात
यापुढे ज्याच्या निर्देश “गुंठेवारी
अधिनियम" असा करण्यात आला आहे) हा 'गुंठेवारी' पद्धतीने विकण्यात आलेल्या
जमिनींवरील बांधकामे नियमाधीन करण्यासाठी अधिनियमित करण्यात आला आहे.
४. गुंठेवारी अंतर्गत विकासकामे नियमाधीन करताना, उक्त गुंठेवारी अधिनियमाच्या तरतुदींनुसार विहित प्रशमन फी आणि विकास आकार वसूल केला जातो. त्याशिवाय, गुंठेवारी खालील जमीन ही वतन किंवा इनाम जमीन असेल तर, अशा वतनाचे किंवा इनाम जमिनीचे अवैध हस्तांतरण नियमाधीन करण्यासाठी, तिच्या मूल्यांच्या पंच्याहत्तर टक्के इतकी रक्कम आकारण्यात
येते.
५. अशा इनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व द्रव्य वसूल केल्या जाणाऱ्या द्रव्यदंडाची रक्कम कमी करण्याची मागणी आहे. म्हणून, शासनास, अशा इनाम किंवा वतन जमिनीवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, अनर्जित उत्पन्नाची एकूण रक्कम आणि द्रव्यदंडाची रक्कम वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा इनाम किंवा वतन जमिनीच्या मूल्याच्या पंचवीस टक्के इतकी कमी करण्यासाठी तरतूद करणे इष्ट वाटते.
६. म्हणून, महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत अधिनियम, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी
करण्याबाबत अधिनियम आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम, १९६२ यांमध्ये, त्यानुसार योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटते.
७. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाब अधिनियम, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत अधिनियम, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम, १९६२ यांच्या तरतुदींमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे; म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
Sunday, 16 August 2020
शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाचा व्याजाचा दर
पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता - १९६६ आणि महाराष्ट्र जमीन
महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम- १९७१ मधील तरतूदीनुसार शासकिय
जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर, अशा जमिनींच्या कब्जेहक्काच्या रकमेवर त्या जमिनीचा आगाऊ ताबा
दिल्यापासून ते अंतिम कब्जेहक्काची किंमत निश्चित करुन तिचा भरणा करण्याच्या
दिनांकापर्यंत १५ % दराने व्याज आकारण्याची. तसेच, शासकीय जमिनीच्या भूईभाड्याचा दर
संपूर्ण बाजारमुल्याच्या १५ % आकारण्याबाबत शासन निर्णय दि. ३०.६.१९९२ अन्वये
तरतुद करण्यात आली होती. या दराबाबत शासनाकडून पुनर्विचार करुन व्याजाच्या व
भूईभाड्याच्या उक्त दरामध्ये सुधारणा करुन संदर्भाधीन शासन निर्णय दि. ८.०७.१९९९
अन्वये सुधारित आदेश देऊन, त्यानुसार
पुढील तरतुद करण्यात आली:
संदर्भ: महसूल व वन
विभाग शासन परिपत्रक क्रमांक :- पीएलआर-२०१६/प्र.क्र.२६/ज-१ दिनांक:- ०३ ऑगस्ट, २०२०.
डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप
पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...
-
पुणे : फेरफार नोंदवहीत नोंद करण्याच्या प्रक्रियेतील विंलंब कमी करण्याच्या आणि अधिकारांचा अभिलेख वेळेत अद्ययावत करण्याच्या सुनिश्चितीच्या हेत...
-
An ambitious ‘Advanced Post Graduate Diploma in Urban Management (APGDUM)’ is open for admission for officers and practitioners working in v...
-
पुणे: महाराष्ट्र राज्यात , इनाम व वतने नाहीशी करण्याबाबतचे पुढील अधिनियम अंमलात आहेत : 1. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्...