Friday 18 July 2014

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 150 (2) मधील दूरूस्ती...





पुणे : फेरफार नोंदवहीत नोंद करण्याच्या प्रक्रियेतील विंलंब कमी करण्याच्या आणि अधिकारांचा अभिलेख वेळेत अद्ययावत करण्याच्या सुनिश्चितीच्या हेतुने, राज्यात एक ई-फेरफार हा संगणकीकृत कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरात उक्त कार्यक्रमांची प्रभावी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतुने आणि या कार्यपद्धतीत, पारदर्शकता आणण्याच्या हेतुने जेथे साठवणुकीचे यंत्र याचा वापर करुन कलम 148-क अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आले असतील तर, तालुक्यातील तहसिलदारांस कलम 154 अन्वये तशी सुचना मिळाल्यावर, तहसिलदार कार्यालयातील तलाठी ती सुचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे, असे अधिकाराच्या अभिलेखात किंवा फेरफार नोंदवहीवरुन त्यास दिसून येईल अशा सर्व व्यक्तींना व त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व तसेच गावाच्या संबंधित तलाठयास, लघुसंदेश सेवा किंवा इलेक्ट्रॉनिक मेल किंवा विहित करण्यात येईल असे कोणतेही उपकरण याद्वारे पाठवील आणि अशी सुचना मिळाल्यावर असा तलाठी फेरफाराच्या नोंदवहीत ताबडतोब नोंद करील, अशी तरतुद करण्याचे प्रस्तावित केले आहे. असेही प्रस्तावित केले आहे की, भारतीय नोंदणी अधिनियम 1908 (1908 चा 16) अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर ज्या व्यक्ती स्वत: दस्तऐवज निष्पादित करतील, अशा व्यक्तींना तहसिलदार कार्यालयातील तलाठयाद्वारे अशी कोणतीही सुचना पाठविणे आवश्यक असणार नाही. म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 150 च्या पोटकलम (2) मध्ये यथोचितरित्या सुधारणा करण्यात आली आहे. 







सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक -30 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 150 च्या पोटकलम(2) मध्ये परंतुक समाविष्ट करुन खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली आहे. (दुरुस्ती अधिनियम पाहण्यासाठी खालील मजकुरावर क्लीक करावे)




“परंतु, जेथे साठवणुकीचे यंत्र याचा वापर करुन, कलम 148 क अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील, तर, तालुक्यातील तहसिलदारास, कलम 154 अन्वये सुचना मिळाल्यानंतर, लगेचच, तहसिलदार कार्यालयातील तलाठी ती सूचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे, असे अधिकारांच्या अभिलेखात किंवा फेरफार नोंदवहीवरुन त्यास दिसून येईल अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तीचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व त्याबरोबर, गावाच्या संबंधित तलाठयास लघुसंदेश सेवा किंवा इलेक्ट्रॉनिक मेल किंवा विहीत करण्यात येईल असे इतर कोणतेही उपकरण, याद्वारे पाठवील, आणि अशी सुचना मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने, फेरफार नोंदवहीत नोंद करील.” 






3 comments:

  1. IF MY PLOT HAVE GOT LANDLOCK BY ALL SIDE WHAT SHOULD I HAVE TO DO IT.

    ReplyDelete
  2. CAN U GIVE U UR NO SO I CAN CONTACT U MY NO IS 09860569001
    VIJAY K SHARMA

    ReplyDelete
  3. namasate,
    जमीन नियम प्रेषितांची कृत्ये,
    अशाप्रकारे रोड प्रवेश वहिवाटिचा हक्क अधिकार माझ्या खाजगी जमिनीचा बंद आहे

    i m vijay sharma from vasai road station i live in vasai .my plot is there in dewanman ( vasai west.) area 23 gunthas dewanman survey no 37 hissa no 2 local authorities vasai virar mahanagarpallika have blocked by road access by all side building r thr seens 15 years what should i have to do it. can u help me in this case.
    can u give me ur no so i can contact u .also as appiontment with ur concern department.
    THANKS TO CONTACTING
    VIJAY K SHARMA.
    WHAT,SAPP NO
    09860569001.

    ReplyDelete

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...