Tuesday 18 November 2008

युनिकोड वैश्विकतेचा नवा मन्त्र

युनिकोड : वैश्विकतेचा नवा मन्त्र २१ ऑक्टोबर, २००८जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठीला समृद्ध करण्याचा उपाय म्हणून युनिकोडकडे पाहिले जाते. आपल्या संगणकावर जेवढ्या प्रक्रिया इंग्रजी भाषेवर करता येतात त्या सार्‍या प्रक्रिया आता मराठी भाषेवरही करता येतात. या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळखही ऑक्टोबरच्या लोकराज्यमध्ये करून देण्यात आलीय.संगणकावरील मराठीच्या वापरात युनिकोडचा अनिवार्यपणे वापर करावा यासाठीचे परिपत्रक नुकतेच महाराष्ट्र शासनाने काढले आहे. मराठीच्या विकासाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घालण्याच्या दृष्टीने शासनाने उचलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. युनिकोड ही भारत सरकारसह सार्‍या जगाने मान्य केलेली सार्वत्रिक अशी व्यवस्था आहे. युनिकोड कन्सॉर्शियम या संस्थेनं जगभरातील सर्व भाषांच्या संगणकावरील वापराचे प्रमाणीकरण केले. त्यातून मराठीसह सर्व भारतीय भाषांना संगणकविश्वात आज मानाचे स्थान मिळाले आहे. संगणकावरील मराठीच्या वापरातल्या सार्‍या समस्या मुळापासून नाहीशा करण्याची क्षमता या व्यवस्थेमध्ये आहे. मुख्य म्हणजे ती कुणालाही मोफत उपलब्ध आहे. विंडोजच्या २००० पुढच्या सर्व आवृत्त्यात व लिनक्सच्याही सर्व अद्ययावत आवृत्त्यांत युनिकोड अंगभूतपणे आहे. कोणत्याही बाहेरुन बसवलेल्या सॉफ्टवेअरशिवाय तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातल्या माणसाला मराठीतून मेल पाठवू शकता. त्यालाही ते विनासायास वाचता येते. ही अत्यंत सुखावणारी गोष्ट आहे.केंद्रशासनाने युनिकोडच्या प्रसारासाठी व संगणकावरील भारतीय भाषांच्या विकासासाठी लक्षणीय प्रयत्न केले आहेत. भारत सरकारच्या www.ildc.gov.in या संकेतस्थळावर विविध युनिकोड फॉन्टससह अनेक सोई डाऊनलोड करता येतात. (या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली तर ते आपल्या पत्त्यावर मोफत सीडीही पाठवून देतात!)युनिकोडमधील नेटवरचा मजकूर शोधण्यायोग्य (सर्चेबल) असतो. गुगल किंवा याहूसारखे सर्च इंजिन मराठीतून तुम्हाला हवा तो मजकूर शोधून देते. ही अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. आपल्या संगणकावर जेवढ्या संगणकीय प्रक्रिया इंग्रजी भाषेवर करता येतात त्या सार्‍या प्रक्रिया युनिकोडमुळे आता मराठी भाषेवरही करता येतात. अकारविल्हे (सॉर्टिंग) लावता येते. मोठामोठ्या सूच्या, याद्या मराठीतून करायला आता कोणतीच अडचण येत नाही. मराठीतून ऑनलाईन फॉर्म भरणे, तक्रारी वा प्रतिक्रिया नोंदवणे अशा अनेक गोष्टी आता शक्य आहेत. आता संगणकावरील मराठीचे शुद्धलेखन तपासनीसही (स्पेलचेकर्स) उपलब्ध आहेत. त्यांचा अधिकाधिक अचूकतेकडे प्रवास सुरु आहे. एकूण युनिकोड हा इ-शासनाचा पायाच आहे.अशा या युनिकोडचा वापर मुंबई महानगरपालिकेने २००२ सालापासूनच सुरू केला आहे. या प्रयोगाच्या सार्वत्रिकीकरणासाठी केले जाणारे प्रयत्न, आयोजित कार्यशाळा तसेच इंटरनेटवर याविषयी कोठे माहिती उपलब्ध आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी http://www.mahanews.gov.in/ Lokrajya

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...