Thursday, 21 October 2010

लोकप्रतीनिधिनी बेकायदेशीर दबाव आणला तर .....नाहीच म्हणायला हवे....अगदी निर्भयपणे

लोकप्रतीनिधिनी बेकायदेशीर दबाव आणला तर .....नाहीच म्हणायला हवे....अगदी निर्भयपने.....अधिकारी आणि लोकप्रतिनिधि यांनी राज्य घटनेच्या व् कयाद्यांच्या कक्षेत राहून काम करावे लगते। संपन्न समाज जीवनासाठी लोकप्रतीनिधिनी स्वच्छ व् पारदर्शकतेचे नवे मापदंड निर्माण करायला हवेत व् आपल्या नैतिक अधिकाराची जरब प्रशासनावर ठेवली पाहिजे, मात्र कगालाचा प्रकार विरुध टोकाचा वाटतो ............मंत्री महोदयच बेकायदेशीर काम करायला प्रोत्स्हाहन देतात॥ तहसीलदार व् इतर अधिकारी बेकायदेशीर कामे ऐकत नाहीत म्हणून खोटा गुन्हा दखल करण्याच्या सूचना देतात......हे काय चालले आहे.......आपला लोकशाहीचा प्रवास चुकत तर नाही ना ...........लोकप्रतीनिधिनी यापुढे जास्त संयमाने व् कायदेशीर मर्गानेच प्रशासन चालवायला अधिकार्याना मदत व् मार्गदर्शन करायला हवे.......आता लोकांचे राज्य सुरु झाले आहे .......अधिकारी यानि तर बेकायदेशीर काम ऐकायलाही नको....करायचा प्रश्नच उदाभावत नाही......सेवा प्रवेशाचा पहिला संस्कार आहे .......चुकीचे .....व् बेकायदेशीर काम करायचे नाही......ते कोणाचे का असेना..................निर्भयपणे सर्वानीच बेकायदेशीर कामे संगनाराना ......नाही .......नाही.......असे बजवयाची वेळ आली आहे.................kahi batamya


मुश्रीफांच्या विरोधातील आंदोलन चिघळले......
कोल्हापूर - कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी उद्या (ता. 21) पासून पुणे विभागातील सर्व पाच जिल्ह्यांत काम बंद आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती राजपत्रित अधिकारी संघटनेचे सरचिटणीस जी. डी. कुलथे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय आणि तहसील कार्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्मचारी-अधिकाऱ्यांना दमदाटी किंवा मारहाण करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणीही करणार असल्याचे कुलथे यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, कोल्हापुरात कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची धार आज अधिक वाढली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय आणि तहसील कार्यालयांना कुलूप लावले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाचे कर्मचारी व्हरांड्यातील खुर्चावर बसून होते. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामाचे तीनतेरा वाजले. कार्यालये बंद करून आजूबाजूच्या कार्यालयातील बहुतांश कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

श्री. मुश्रीफ यांनी कागलचे तहसीलदार संपत खिलारी यांच्यासह तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला. काल जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची मासिक बैठक होती. त्यामुळे अधिकारी एकत्रित आले. तेथेच त्यांनी मासिक बैठकीवर बहिष्कार टाकून काम बंद करण्याचा निर्धार केला. काल त्यांनी बंद पाळला; मात्र आज जिल्ह्यातील सर्वच महसूल कार्यालयांना कुलुपे होती. जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही नव्हते. सकाळी साडेदहाच्या सुमारास कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यातील खुर्च्यांवर बसून होते. निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांच्या केबिनलाही कुलूप होते. साधारण अकराच्या सुमारास सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले. तेथे राज्य कर्मचारी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला. कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफांना माफी मागायला लावायचीच, असा निर्धार या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी केला.

सायंकाळी कुलथे त्यांच्या संघटनेच्या कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यांनी या सर्व आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मंत्री मुश्रीफांनी माफी मागितल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धारही त्यांनी केला.

त्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कुलथे म्हणाले, ""लोकप्रतिनिधींच्या वाढत्या त्रासाला कर्मचारी-अधिकारी कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांची अरेरावी, दादागिरी खपून घेतली जाणार नाही. कालचा प्रकार निंदनीय असल्यामुळेच कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या कामबंद आंदोलनाला सर्वांनी एकजुटीने पाठिंबा दिला आहे. मुश्रीफांनी माफी मागितली नाही तर उद्यापासून पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे चार जिल्ह्येही बंदमध्ये सहभागी होतील. आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत जाणार आहोत. नागरिकांची कामे खोळंबत आहेत, याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे मुश्रीफांनी तातडीने माफी मागावी. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना दमदाटी-मारहाण करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणीही आम्ही शासनाकडे करणार आहोत. "मॅट' रद्द करण्याचा शासनाचा डावसुद्धा आम्ही हाणून पाडणार आहोत. ज्या दिवशी हा प्रस्ताव मंजूर होईल, त्या दिवसापासून बेमुदत बंद पुकारला जाणार असल्याचे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे.''

महिला अधिकाऱ्यांबद्दल बोलताना कोलथे म्हणाले, ""कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी महिला अधिकाऱ्यांना कोणत्याही कामासाठी घरी बोलवायचे नाही. सर्व बैठका कार्यालयातच झाल्या पाहिजेत. इतर अनेक बाबीही आमच्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे "दुर्गा महिला मंच' स्थापन केला जाणार आहे. हा मंच महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करणार आहे. यासंबंधी आम्ही अमरावतीत नोव्हेंबरला अधिवेशन घेऊन त्याबाबत ठराव करणार आहोत.''

यावेळी महसूल विभागासह अन्य विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते. उद्यापासून अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारीही बंद आंदोलनात सहभागी होण्याची शक्‍यता आहे.

टपाल कोण घेणार?
सकाळी साडेदहाच्या सुमारास टपाल देण्यासाठी पोस्टमन जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनसमोर आले. मात्र, तेथे टपाल घेण्यासाठी कोणीही नव्हते. तेथे काही वेळाकरिता आलेल्या एका कर्मचाऱ्याला टपाल घेण्याची विनंती पोस्टमनने केली; मात्र त्यांनी टपाल घेण्यास नकार दिला. संबंधित पोस्टमनने ही माहिती त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून दिली. अखेर ते टपाल कोणीही घेतले नाही.

अन्य अधिकारी काळ्या फिती लावणार
महसूल व्यतिरिक्त अन्य विभागातील राजपत्रित अधिकारीही उद्यापासून काळ्या फिती लावून काम करणार आहेत। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठिंबा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. श्री. कुलथे यांनी रात्री महसूलसह अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सन्दर्भ : http://www.esakal.com/esakal/20101021/5374867424006397393.हतं
सकाळ वृत्तसेवा: Thursday, October 21, 2010 AT 01:01 AM (IST)

Tuesday, 19 October 2010

डॉ. संजय राडकर यांचे अकाली निधन

डॉ।संजय राडकर यांचे दि. १९/१०/२०१० रोजी दू। ३.३० च्या दरम्यान पाम बिच रोड मुंबई येथून पत्नीसह प्रवासात अपघाती निधन झाले। हे अत्यंत दुर्दैवी वृत्त महाराष्ट्रातील तमाम महसूल अधिकार्यांसाठी तसेच सर्व मित्र परिवारासठी धक्कादायक आहे । डॉ।संजय राडकर हे १९८६ च्या तुकडिचे सर्वप्रथम आलेले उपजिल्हाधिकारी। त्यानी महसूल प्रशासनातील सर्व पदांवर काम केले, तसेच मंत्रालयात ते विशेष कार्य अधिकारी म्हणून कही काळ कार्यरत होते। त्यानी पंतप्रधान कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून सेवा केली. ते अप्पर जिल्हाधिकारी म्हणून दीर्घ रजा घेउन ते रिलायंस सेझ प्रकल्पाचे मुंबई येथे काम पाहत होते। ते विलक्षण बुद्धिमान व् अत्यंत कार्यकुशल अधिकारी म्हणून सर्व परिचित होते। त्यांच्या अकाली निधनाने महसुली संवार्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे । सर्व महसुली संवार्गाचे वतीने त्यांच्या पवित्र स्म्रुतिना प्रणाम व् चिरशांतिसाठी मनपूर्वक प्रार्थना।

पाम बीचवरील अपघातात 2 ठार; 5 जखमी
- दै सकाळ वृत्त दि: २०/१०/2010

वाशी-पाम बीच मार्गावर भूमिराज बिल्डिंगसमोर मंगळवारी (ता. 19) झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात "रिलायन्स एसईझेड'चे अधिकारी संजय राडकर (वय 50) यांच्यासह दोन जण ठार; तर पाच जण जखमी झाले. या अपघातात राडकर यांचा कारचालक राजेंद्र कदम (28) याचाही मृत्यू झाला आहे. कदम हा सानपाडा येथे शिवसेना गटप्रमुखही होता. राडकर यांची पत्नी शुभांगी यांच्यासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी यांच्यावर नेरूळ येथील शुश्रुषा रुग्णालयात; तर कुशल अवस्थी (20) व सोनिया मास्किटा (18) या जखमींवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे दोघेही डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. राडकर यांची ऍसेट कार वाशीहून सीबीडीकडे येत होती. दुपारी 3 वाजता भूमिराज बिल्डिंगसमोर त्यांची गाडी आली असता, अचानक सीबीडीहून वाशीकडे जाणाऱ्या एंडिवेअर कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार दुभाजक ओलांडून राडकर यांच्या कारवर आदळली. त्यांच्या कारच्या मागे असलेली आणखी एक सॅन्ट्रो कार राडकर यांच्या कारवर आदळली. त्यात कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोकण भवन येथे पूर्वी महसूल विभागात कार्यरत असलेले राडकर काही महिन्यांपासून सुटीवर होते. सध्या ते रिलायन्स एसईझेड प्रकल्पात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथील सेवा संपल्यावर ते पुन्हा शासकीय सेवेत रुजू होणार होते. या दुर्घटनेमुळे शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस, पालिका व कोकण भवनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

सन्दर्भ: http://72.78.249.107/esakal/20101020/5308896064054017134.htm



Monday, 11 October 2010

डॉ. अर्जुन चिखले यांचे नविन पुस्तक

जलगाँव- डॉ. अर्जुन चिखले यांचे नविन पुस्तक ' तलाठी मार्गदर्शक ' हे नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे त्यांचे सहावे पुस्तक असून यापूर्वी त्यानी रोजगार हमी योजना, सामाजिक लेखा परिक्षण, आरक्षण, जातप्रमाणपत्र तपासणी इ. महत्वाचे विषयावर लेखन केले आहे. श्री चिखले हे अत्यंत अभ्यासू व व्यासंगी महसूल अधिकारी असून त्यांच्या या नव्या पुस्तकाचा तलाठी, मंडल अधिकारी व सर्वच वाचाकाना फायदा होईल.
श्री
चिखले यांचे अभिनंदन व पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा ।

पुस्तक प्रकाशनाचा सोहळा! - 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!'










Thursday, 7 October 2010

पुस्तक प्रकाशन सोहळा - श्री. शेखर गायकवाड लिखित 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा!' Click

पुणे:- श्री. शेखर गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी यांचे 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा!' या सातव्या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ९ ऑक्टोबर २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे सकाळी ९.३० वाजता होत आहे. साध्या सोप्या भाषेत शेतक-यांना विविध कायदे समजावून सांगणारे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकाशन सोहळयासाठी हार्दीक शुभेच्छा! ज्यांना शक्य असेल त्यांनी जरुर सहभागी व्हावे। श्री शेखर गायकवाड यांचे हे सातवे पुस्तक असून त्यांचे यापुर्विचे गोष्टिरूप पद्धतीने लिहिलेले महसुली पुस्तक, फेरफार नोदी, कायदे शेतीचे, समन्यायिक कार्यपध्दती, माहितीचा अधिकार कायदा ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय व संदर्भ मूल्य असणारी पुस्तके ठरली आहेत । आता हे नविन 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा!'श्री. शेंखर गायकवाड यांनी यापूर्वी शेतक-यांनो सावधान (1996) फेरफार नोंदी (1999), गोष्टीरूप जमिन व्यवहार निती (2002), शेतीचे कायदे (2005) अधिका-यांची अर्धन्यायिक कार्यपद्धती (2008), अशी सहा पुस्तके लिहिली आहेत। तसेच माहिती अधिकार कायद्याचे एक पुस्तक नुकतेच यशदाने प्रकाशित केले आहे. श्री. शेखर गायकवाड यांची वरील सर्व पुस्तके संदर्भमुल्य असल्याने अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहेत. आता प्रकाशित होणारे 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा (२०१०)' हे पुस्तक शेतकरी, व्यावसायिक, महसूल अधिकारी, उद्योजक व अभ्यासक असे सर्वांनाच उपयुक्त ठरेल। या नव्या पुस्तकाबद्दल श्री. शेखर गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या भावी लेखन प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा।

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...