Thursday 7 October 2010

पुस्तक प्रकाशन सोहळा - श्री. शेखर गायकवाड लिखित 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा!' Click

पुणे:- श्री. शेखर गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी यांचे 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा!' या सातव्या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ९ ऑक्टोबर २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे सकाळी ९.३० वाजता होत आहे. साध्या सोप्या भाषेत शेतक-यांना विविध कायदे समजावून सांगणारे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकाशन सोहळयासाठी हार्दीक शुभेच्छा! ज्यांना शक्य असेल त्यांनी जरुर सहभागी व्हावे। श्री शेखर गायकवाड यांचे हे सातवे पुस्तक असून त्यांचे यापुर्विचे गोष्टिरूप पद्धतीने लिहिलेले महसुली पुस्तक, फेरफार नोदी, कायदे शेतीचे, समन्यायिक कार्यपध्दती, माहितीचा अधिकार कायदा ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय व संदर्भ मूल्य असणारी पुस्तके ठरली आहेत । आता हे नविन 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा!'श्री. शेंखर गायकवाड यांनी यापूर्वी शेतक-यांनो सावधान (1996) फेरफार नोंदी (1999), गोष्टीरूप जमिन व्यवहार निती (2002), शेतीचे कायदे (2005) अधिका-यांची अर्धन्यायिक कार्यपद्धती (2008), अशी सहा पुस्तके लिहिली आहेत। तसेच माहिती अधिकार कायद्याचे एक पुस्तक नुकतेच यशदाने प्रकाशित केले आहे. श्री. शेखर गायकवाड यांची वरील सर्व पुस्तके संदर्भमुल्य असल्याने अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहेत. आता प्रकाशित होणारे 'शेतक-यांनो जमिनी सांभाळा (२०१०)' हे पुस्तक शेतकरी, व्यावसायिक, महसूल अधिकारी, उद्योजक व अभ्यासक असे सर्वांनाच उपयुक्त ठरेल। या नव्या पुस्तकाबद्दल श्री. शेखर गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या भावी लेखन प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा

No comments:

Post a Comment

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...