Friday, 28 October 2022

महसुल अधिकाऱ्यांचे लक्षणीय प्रयोग-१ - डॉ. मोहसीन शेख

पुणे: डॉ. मोहसीन शेख हे सध्या राहता येथे महसूल मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते प्रयोगशील आहेत व नव्या तंत्रज्ञानावर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. त्यांचे http://mohsin7-12.blogspot.com/ या ब्लॉगमुळे ते सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी अलीकडेच एक नवीन प्रयोग केला. हल्ली कोणत्याही कोर्टातून निकालपत्र प्रमाणित प्रत व इतर कागदपत्रे प्राप्त करणे खूप जिकिरीचे काम बनले आहे. डॉ. मोहसीन शेख यांनी त्यांचे समोर चाललेल्या वाटग्रस्त नोंदीचा निर्णय दिल्यानंतर प्रथमच त्यांचे अर्धन्यायीक निर्णयाची लेखी समज म्हणजे सुचनापत्र देताना एका कोपऱ्यात डिजिटल सही असणाऱ्या पूर्ण निकालपत्राचा ‘क्यूआर कोड’ छापून पाठविला. त्यामुळे संबंधित पक्षकाराना पुनः त्यांचे कार्यालयात येऊन प्रमाणित प्रती मागण्याचा त्रास वाचला व घरबसल्या ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून डिजिटल सहीचा निकाल वाचायला मिळाला. शासकीय कार्यालयांना इतक्या आपुलकीशिवाय लोकाना वेगळे काय हवे. या नावीन्यपूर्ण कल्पक व स्तुत्य प्रयोग्यचा हा अल्पसा परिचय:


No comments:

Post a Comment

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...