Tuesday, 25 January 2011

Notice of strike -protest on 27th Jan 2011

To Hon.Chief Minister, Hon. Chief Secretary, Hon. Principal Secretary , Revenue & Forest ,GOM Maharashtra Respected Sir
We are deeply shocked on todays unfortunate incidence of burning alive Additional Collector, Malagaon late Yashwantrao Sonawane, who is reported badly beaten before setting ablaze. This is cruelty against humanity and challenge to rule of law. This is happening for the first time in the history of peaceful Maharashtra and symptomatic of grave dangers of rule of law.
We all Revenue Offices are in deep pain and agony. Mr. Yashwantrao Sonawane was a very calm, cool and upright officer and this has sent shock across all cadres not only revenue officers but across all services. Are officers working in field safe at all ? there are every now and then attacks by SAND MAFIAS , PDS mafias, NOW OIL MAFIAS AND MANY MORE. We all revenue officers are unanimous on not working for one day ----on 27th January 2011 in protest to attract attention of Government to seriousness of safety of its officers and employees . On behalf of all associations of revenue officers, I am intimating this as a notice to Government. Our demands: 


1) Police need to be more aggressive against such offenders, they must deter to do such type of crime. 
2) Stern action against offenders......MCOCA like action 
3) Indepth inquiry of malpractices of OIL mafia.........in question including involvement of oil cos.- 
4) Govt.to have policy for safety and security of its officers and staff. Now this has happened with Additional Collector......the prestigious institution of Govt. Administration..... this can happen with anybody in village or at any place....................... This has to be stopped.....seriously......we are working day and night for Government without caring families and private life...........Now it is too much..... -------------------------------------------- Pralhad Kachare General Secretary Federation of Revenue Officers Associations 9422750464, 9158001350 (Notice sent by mail to all)

Close down in protest

Today Additional Collector, Malagaon late Yashwantrao Sonawane, badly beaten abd urnt alive by Oil Mafias near Manmad while he was investigating malpracatices and petrol adulteration . All Revenue Officers and staff strongly condemn this coward attack against humanity.

We are shocked by this brutal attack and all are furious over the state of affair of rule of law in our state. Police need to be more aggressive and create deterrence of rule of law in the minds of law breakers.

All Revenue officers are unanimous on closing down work on 27th January 2010. Please spread this across the state. All get together, protest peacefully and let us try to make Government aware that we all Government officers and employees are working in a very insecure state . Every now and then there are attack on officers who are working in field. All law breakers, black marketeers of PDS, Minor Mineral, Petrol and Oil need to be tackled very aggressively.

Let us all press it, all other Government officers, employees associations and Gazetted Officers Associtions have pledged their support, this is a common cause for all.......we want secure workplace......safe and secure administrative maharashtra..........

Let us close down.......let us protest peacefully.......

Pralhad Kachare
General Secretary
Federation of Revenue Officers Associations

Maharashtra shocker: Addl Collector burnt alive for opposing oil mafia

Mumbai: In a shocking incident, Additional District Collector of Nashik, Yashwant Sonawane, was burnt alive on Tuesday for cracking down on the oil mafia operating in the vicinity of Panewadi oil depot near Manmad town, 75 kilometres from the district headquarters.

As per reports, at around 11.30 am, Sonawane, who was going on an official tour, reportedly saw some suspicious activity going on in the vicinity of the oil depot – the area is infamous as a hub for oil adulteration.

He got down from his car to further probe the matter but was cornered by members of the mafia who, reportedly, beat him up, and then set him on fire in broad daylight. His body is still lying at the spot.

At the time of the incident, he was said to be accompanied only by his personal assistant and without any police cover.


Some reports claimed that he was raiding the area as per plan that information was leaked to the mafia about his movement leading to the tragic incident।


The attackers fled after the incident. Police have launched a massive manhunt to track and arrest the attackers. There are also reports that one of the attackers has been arrested but there is no official confirmation at the moment.

Sonawane was known as an upright officer who had been carrying out a crusade against the oil mafia operating in the district.

In Mumbai, state Chief Minister Prithviraj Chavan has ordered an inquiry into the incident and has assured that that strictest possible action would be taken against the offenders.

Meanwhile, Maharashtra state gazetted officers association has announced that they will strike work on January 27 to protest against the incident. They have also demanded that they be given adequate security so as to help them discharge their duties effectively.

Oil mafia burns Malegaon Additional DC Alive

Oil mafia burns Malegaon Additional DC Alive

प्रजासत्ताकाच्या पूर्वसंधेला कायद्याचे राज्याला आव्हान

प्रजासत्ताकाच्या पूर्वसंधेला कायद्याच्या राज्याला आव्हान देना-या पेट्रोल भेसळ करना-या टोलिच्या हल्ल्यात एका शांत, मितभाषी, सुस्वभावी व् संयमी नागरी सेवा अद्धिका-याचा दुर्दवी अंत झालामालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंतराव सोनवने याना अनियामियतातेला विरोध करण्याच्या प्रयत्नात जिवंत जान्यात आलेधिक्कार ...धिक्कार....धिक्कार या अमानवी कृतीचा , या विकृतिचा व् अश्या असुरक्षित व्यवस्थेचा ......आता जागे व्हा.....आपण सुरक्षित नसू तर कुणीच सुरक्षित नसेल ........प्रश्न गंभीर आहे .....विचारपूर्वक सर्वानी एकत्र येउन मार्ग काढावा लागेलस्वर्गीय यशवंतराव सोनवने यांच्या निर्भयतेला अणि कर्ताव्यदाक्षतेला सलाम करून चला सर्व एक होऊ यानम्रतापूर्वक श्रधान्जली

Wednesday, 5 January 2011

यस वुई कॅन..

लक्ष्मी आपली वेतन चिठ्ठी व बँकेचे पासबुक घेऊन भराभर शांतीकडे गेली. तिथे इतरही जमले होते. लक्ष्मीला शांतीने ६५४ रुपये दिले. शांतीने लक्ष्मीचा अंगठा मशीनवर टेकवला, छोटासा लाल दिवा लागला, बीप आवाज झाला, छोटय़ाशा प्रिंटरवरून एक कागद बाहेर आला, त्याचा एक भाग शांतीने लक्ष्मीला दिला. लक्ष्मी ही रोजगार हमीवरील मजूर आणि शांती त्याच गावातील जरा शिकलेली बचत गटातील महिला. या तळ्याच्या कामाची, ग्राम रोजगार सेवक, सुनिता, रोजच्या रोज तिच्या मोबाईलवर सर्व मजुरांची उपस्थिती नोंदवते व लगेच त्याचा ‘मेसेज’ पाठवते. तो ‘मेसेज’ मंडल कार्यालयातील संगणकाला थेटपणे मिळतो आणि उपस्थिती रेकॉर्ड होते, रोजच्यारोज. या तळ्याच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक आठवडय़ाला मालिनी तिचा मोबाईल घेऊन जाते आणि झालेल्या कामाचे मोजमाप ‘जीपीएस’ द्वारे मोबाईलवर टिपते. या माहितीचे ‘मेसेज’मध्ये रूपांतर करून मंडल कार्यालयातील संगणकाला थेट रवाना करते. प्रत्येक मजुराची उपस्थिती, केलेले काम, त्या त्या कामाचा दर याचा हिशेब करून प्रत्येक मजुराने कमावलेल्या मजुरीचा तक्ता मंडल कार्यालयातील संगणकाद्वारे तयार केला जातो. या मजुरी वाटप पत्रकावर मंडल अधिकारी अंगठा व पासवर्ड (डिजीटल सही) देऊन मंजुरी देते व ते इंटरनेटच्या माध्यमातून बँकेला कळवते. बँक ते मजुरीपत्रक आपल्या त्या भागातील बिझनेस करस्पॉडन्ट एजन्सी रोख रक्कम घेऊन त्यांनीच नेमलेल्या शांतीकडे विशिष्ट दिवशी सुपूर्द करते. त्या आधीच मंडल अधिकारी मजुरीपत्रकाच्या माहितीच्या आधारे संगणकाने तयार केलेल्या प्रत्येक मजुराची वेतन चिठ्ठी सुनिताकडे पाठवते. सुनिता ती वेतन चिठ्ठी लक्ष्मी व इतर मजुरांना देते. अशा पद्धतीने मागील आठवडय़ातील कामाची मजुरी लक्ष्मीला आज मिळाली.
काय वाटते हे वाचून? काल्पनिक? विज्ञान कथा? नावे व इतर तपशील तर आपल्याच देशातील वाटतात; परंतु बाकी यंत्रवापर पाहता कुठल्याशा प्रगत देशातील व्यवस्था वाटते ना? अहो, हे तर शेजारच्या राज्यातील म्हणजे आंध्र प्रदेशमधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीतले खरेखुरे, अस्तित्वातले या डोळ्यांनी पाहिलेले चित्र आहे.
आंध्र प्रदेशने फेब्रुवारी २००६ साली रोहयो राबवायला सुरुवात केली. योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आजपर्यंत या राज्याने अत्यंत सातत्याने प्रभावीपणे हा कार्यक्रम गरीबांपर्यंत पोचवला आहे. मागील वर्षी या राज्यात चाळीस कोटींहून अधिक मजूर दिवस निर्मिती केली व त्यासाठी ४५०९ कोटी असा सर्वाधिक खर्च त्यांनी केला आहे. म्हणजे एका एका जिल्ह्यांत सरासरी दोन-अडीचशे कोटी रुपये खर्च! हे कसे साध्य झाले? सध्याच्या आजुबाजूच्या गैरव्यवहाराच्या व घोटाळ्यांच्या दुनियेत, आपल्याच राज्यात ‘रोजगार हमी - अर्धे तुम्ही व अर्धे आम्ही’ अशी ख्याती असताना हा एवढा कोटय़वधीचा खर्च खरोखरच मजुरापर्यंत पोचतो का ही शंका येणे अगदीच स्वाभाविक आहे. हे समजून घेण्यासाठी मागील वर्षभर आंध्र प्रदेशमधील रोहयो अंमलबजावणी यंत्रणेचा, व्यवस्थेचा अभ्यास दौरा केला.
कोरडवाहू, वरच्या पाण्यावर अवलंबून शेती, पारंपरिक पिके, भरडधान्य घेणाऱ्या गावातील गरीब मजुराला, भूमिहीन शेतमजुराला, अल्पभूधारक शेतकरी-शेतमजुराला रोहयो हा जगण्याचा शेवटचा पर्याय आहे. त्या मजुराला हा पर्याय अधिकार म्हणून मिळालेला आहे. हा अधिकार त्याला-तिला मिळवण्यासाठी तशी व्यवस्था उभी करणे आवश्यकच नाहीतर अधिकार कागदावरच राहणार हे निश्चित.
मागणीप्रमाणे काम - कसे मिळते?
सर्वप्रथम मजुराने लाचारीने काम सुरू होण्याची वाट पाहायची नाही तर तिला ‘मागेल तेव्हा काम मिळाले पाहिजे’ असे कायदा सांगतो. आंध्र प्रदेशमध्ये याची तयारी पावसाळ्यात केली जाते. रोहयोची मागणी सहसा पावसाळ्यात नसते म्हणून. प्रत्येक चार-पाच ग्रामपंचायतीला एक तांत्रिक सहाय्यक नेमलेला आहे. गावाने ग्रामसभेत मंजूर केलेल्या कामांची यादी घेऊन तेथील तांत्रिक सहाय्यकाने कामाच्या ठिकाणाची पाहणी करून मोजमापे घ्यायची. ही माहिती मंडल कार्यालयातील (मंडल हा आंध्र प्रदेशमधील प्रशासकीय विभाग आपल्याकडील तालुक्याशी समांतर आहे. फक्त मंडलमध्ये ग्रामपंचायतींची संख्या साधारणत: २० एवढी असते.) संगणकात फीड केल्यावर त्यातील प्रोग्रामद्वारे त्या कामाचा आराखडा, डिझाईन खर्चाच्या अंदाजासह तयार होतो. असा प्रत्येक गावाचा ‘शेल्फ’ तयार करून ठेवला आहे. प्रत्येक गावाची संभाव्य मजुरांची माहिती, त्यांचे जॉब कार्ड सुनिताने तयार केलेले आहेत व ही सर्व माहिती मास्टर डेटाबेसमध्ये मंडल कार्यालयात, एका क्लिकच्या अंतरावर उपलब्ध आहे.
गावातील लोक कामाची मागणी सुनिता जवळ करतात. त्याप्रमाणे ती मंडल कार्यालयातून ‘शेल्फ’वरील एक पुरेसे काम व त्यासाठीचे मस्टर, मोबाईलवर मजुरांची यादी घेते. मालिनीला म्हणजे तांत्रिक साहाय्यकाला बोलावून कामाची आखणी करून काम सुरू करून देते. या सर्व पद्धतीमुळे काम खरेच मागणीप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे पंधरा दिवसांत सुरू होते.
कामाचे दाम वेळेत कसे मिळणार?
जसे काम वेळेत सुरू होणे हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे त्यालाच जोडून दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कामाचा मोबदला वेळेवर व योग्य मिळणे हा होय. कायद्याप्रमाणे मजुरी दर पंधरा दिवसाला मिळाली पाहिजे. रोहयोवर मजुरी रोजावर नाहीतर केलेल्या कामाचा मोबदला आहे (पीसरेट). हे सोपे नाही. यासाठी प्रत्येक मजुराचे हजर दिवस, केलेल्या कामाचे मोजमाप, झालेल्या कामाला दर सूचीप्रमाणे दर लावून प्रत्येक मजुराचा हिशोब करायचा असतो. सर्व मजुरांचे एकत्रित मजुरी पत्रक दर आठवडय़ाला तयार करायचे असते. यासाठी आंध्र प्रदेशने नव्याने जीपीएस तंत्रज्ञान असलेले मोबाईल मालिनीसारख्या तांत्रिक साहाय्यकाला दिले आहेत. मालिनी दर आठवडय़ाला मोजमाप घेते व मंडल कार्यालयातील संगणक कक्षाकडे माहिती पोचवते. मस्टरवरील माहिती आणि मोजमाप यावर आधारित सर्व हिशेब, मजुरीपत्रक बनवणे, वेतनचिठ्ठी बनवणे यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. याने काम झटपट होते व जास्त अचूक होते. कायद्याप्रमाणे मजुरीची रक्कम मजुराला थेट बँक किंवा पोस्टाच्या खात्यावर जमा करायची आहे. आंध्र प्रदेशने मजुरी आधी पोस्टातून पण बहुतेक ठिकाणी आता बँकातून देण्यास सुरुवात केलेली आहे. पण बँकेच्या शाखा खेडोपाडी नाहीत. इथे त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या बिझनेस करस्पॉन्डन्ट मॉडेलचा सुरेख उपयोग केला आहे. यामध्ये खासगी बिझनेस करस्पॉन्डन्ट एजन्सी आहेत. या कोणत्याही बँकेशी कराराने संलग्न होऊन विशिष्ट ग्रामीण भागात त्या बँकेचे कामकाज पोचवतात. या एजन्सी एकाच वेळी विविध भागातून विविध बँकांच्या बरोबर करार करून जेथे बँक नाही तेथे नेऊन पोचवतात. अशा पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये हजारो खेडय़ातून बँक पोचली आहे. या एजन्सीजने आपली माणसे गावोगावी नेमली आहेत, त्यातली एक शांती. या सर्व व्यवस्थेमुळे कायद्यातील नियमाप्रमाणे वेळेत व योग्य मोबदला गावातच मजुराला मिळण्याची सोय झाली.
व्यवस्थापन पद्धती, पारदर्शकता आणि तक्रार निवारण याचे महत्त्व
आंध्र प्रदेशमधल्या ‘भारतात’ इंडियाच्या माहिती तंत्रज्ञानाने हे सर्व शक्य केले आहे. पण चुका होत नसतील, गैरव्यवहार होत नसेल, अनियमितता नाही? कोणतीही व्यवस्था शंभर टक्के पक्की मजबूत असू शकत नाही. यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली आहे. एका टोल फ्री नंबरवर मजूर किंवा कोणीही तक्रार कळवतात. रोज असे शेकडो फोन राज्यभरातून येतात व त्याची दखल घेतली जाते. कॉल सेंटरच्या माध्यमातून याचे पूर्ण व्यवस्थापन केलेले आहे. सोशल ऑडिटची एक विस्तृत स्वतंत्र देखरेख करणारी यंत्रणा नियमितपणे राबवली आहे. झालेल्या कामांचा तपशील घेऊन, एका संस्थेतील कार्यकर्ते (ही संस्था काही अंशी सरकारी आहे आणि यातील कार्यकर्ते वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेतील करारावर घेतलेले आहेत) आठ-दहा दिवस गावातील प्रत्येक मजुराच्या घरी जाऊन तपासतात. ग्रामसभेत याचे वाचन होते. त्यातील तक्रार, आक्षेप नोंदवले जातात. मंडलमधील अशा सर्व गावांच्या अहवालांचे सार्वजनिक वाचन जन सुनवाईच्या माध्यमातून केले जाते. या वेळी गैरव्यवहार आढळल्यास त्वरित कार्यवाही केली आहे. वेळ पडल्यास पोलीस तक्रारीही नोंदवल्या आहेत.
सर्व गावातील कामांची, मजुरांची, खर्चाची पूर्ण माहिती अद्ययावत, अगदी मागच्या आठवडय़ातील, त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माहितीवर आधारित विविध अहवाल पाहायला मिळतात. ही अशी कमालीची पारदर्शकता अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही.
सुनिता, मालिनी, संगणक कर्मचारी, मंडल कार्यालयातील अधिकारी यांचे सातत्याने प्रशिक्षण होते, प्रशिक्षणाची हस्तपुस्तिकाही सहजसुलभ पद्धतीची आहे. ही या सर्व व्यवस्थेची गाभ्याची बाजू आहे असे वाटते. व्यवस्थापनातील प्रत्येकाला आपण या कडीच्या कोणत्या टप्प्यावर कोणती भूमिका बजावतोय याचे चांगले भान आहे असे दिसले. पंधरा दिवसात मजुरी दिली पाहिजे तर त्यासाठी मी आज काय करायला हवे हे पक्के माहीत आहे आणि त्यासाठीचे कौशल्य व तंत्रज्ञान अवगत आहे.
आज आंध्र प्रदेश एकूण खर्चाच्या ७० ते ८० टक्के मजुराला मजुरीच्या रुपात देत आहे. यातला काही भाग गैरव्यवहारात जात असेलही. परंतु या व्यवस्थापन पद्धतीने, माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने, पारदर्शकतेने, देखरेख यंत्रणेने, तक्रार निवारण यंत्रणेने गैरव्यवहाराचा भाग कमीत कमी राहील अशी रचना निश्चितच उभी केली आहे. हे सर्व अद्भूत वाटते. ही रचना ‘भारतातल्या’ अकुशल अंगमेहनतीची काम करणाऱ्या लक्ष्मीच्या अधिकाराच्या जोपासणीसाठी आपल्या राज्यघटनेच्या साठाव्या वर्षी लक्ष्मीला मिळालेले हे बळ खूप दिलासा देणारे आहे। बुधवार दि जानेवारी २०११ चे लोकसत्ता मधील अश्विनी कुलकर्णी यांचा लेख

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...