पुणे: राज्यातील सर्व जिल्ह्यात विकास आराखड्याप्रमाणे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता अकृषिक (एनए - नॉन अॅग्रीकल्चर) परवानगी घेण्याची गरज नाही. जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, केवळ अकृषिकची आकारणी करून बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे. सदनिका बांधताना येणाऱ्या अडचणींमधून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी राज्य सरकारने गेल्या ६ वर्षापासून नियमावलीत शिथिलता आणली आहे. मात्र, यासंदर्भातील अंमलबजावणीबाबत महसूल विभागाचे अधिकारी, महानगर पालिका, नगरपालिका व नागरिकांमध्ये संभ्रम होता. बँकांकडूनही कर्ज देताना एनए परवानगीची विचारणा केली जात होती. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४२ब, ४२क आणि ४२ड मधील तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. तथापि अजूनही नागरिक एन ए च्या बाबतीत सर्वत्र संभ्रम आहे असे बोलतात. यासाठी दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी एक व्हिडीओ क्रमांक १० प्रसारित केला होता. त्यावरील प्रश्नांची चर्चा करणारा हा व्हिडीओ:
Wednesday, 2 December 2020
Subscribe to:
Posts (Atom)
डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप
पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...
-
पुणे : फेरफार नोंदवहीत नोंद करण्याच्या प्रक्रियेतील विंलंब कमी करण्याच्या आणि अधिकारांचा अभिलेख वेळेत अद्ययावत करण्याच्या सुनिश्चितीच्या हेत...
-
An ambitious ‘Advanced Post Graduate Diploma in Urban Management (APGDUM)’ is open for admission for officers and practitioners working in v...
-
पुणे: महाराष्ट्र राज्यात , इनाम व वतने नाहीशी करण्याबाबतचे पुढील अधिनियम अंमलात आहेत : 1. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्...