Thursday, 31 December 2009

तहसीलदारांच्या खात्यातून 63 लाख गायब

तहसीलदारांच्या खात्यातून 63 लाख गायब
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 31, 2009 AT 12:15 AM (IST)
Tags: western maharashtra, crime

शेवगाव - येथील तहसीलदारांच्या खात्यातून तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी, तसेच येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्ध बनावट व्यक्तीच्या नावाने वाहक धनादेशाद्वारे साडेसात महिन्यांपासून 63 लाख 11 हजार 600 रुपये एवढी मोठी रक्कम परस्पर काढून अपहार केल्याची फिर्याद तहसीलदार नितीन पाटील यांनी आज दिल्याने महसूल खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात तहसील कार्यालयात गौण खनिज विषयाची जबाबदारी सांभाळणारे लिपिक बी. आर. पवार व एप्रिल महिन्यापासून कार्यालयात हजर नसणारा कर्मचारी महेश श्रीबास यांचा हात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. या जोडगोळीने व्ही. बी. कानडे या बनावट व्यक्तीच्या नावे काढलेले धनादेश बॅंकेत जमा करून, एवढी मोठी रक्कम काढल्याचे सीसी टीव्हीवरील चित्रीकरणावरून स्पष्ट झाले आहे.

तहसीलदार पाटील 16 सप्टेंबरला येथे हजर झाले. विधानसभा निवडणुकीचे काम उरकल्यानंतर गौण खनिज विभागाच्या कागदपत्रांची तपासणी करताना एप्रिल 2009 ते नोव्हेंबर 2009 अखेर इतर विभागांमार्फत गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या रकमेचे प्राप्त धनादेश व गौण खनिजाच्या लेखाशीर्षकांतर्गत सरकार जमा रकमेची त्यांनी तपासणी केली. तेव्हा या खात्यातून वरील रक्कम सरकारी खजिन्यात जमा न होता प्रत्यक्ष व्ही. बी. कानडे या व्यक्तीच्या नावे काढण्यात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे व्ही. बी. कानडे कोण, हा प्रश्‍न त्यांना पडला.

या संदर्भात त्यांनी बॅंकेशी पत्रव्यवहार करून खात्याचे स्टेटमेंट व इतर कागदपत्रे मागितली व तपासली. यामध्ये ता. 15 मे 2009 ते 25 नोव्हेंबरदरम्यान 19 धनादेशांद्वारे 63 लाख
रुपये काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

या धनादेशांवर तहसीलदारांच्या सह्या व शिक्के बनावट असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बॅंकेमध्ये धनादेश वटवताना त्यावर सक्षम अधिकारी तथा तहसीलदार यांची सही
आहे का, याची खातरजमा बॅंकेने करणे अपेक्षित होते. बॅंकेच्या शाखा व्यवस्थापनाने तसे न केल्याने त्यांच्या विरुद्धही फिर्याद दिली आहे.

धनादेश काढलेली कानडे ही व्यक्ती तहसील कार्यालयात कामास नसल्याने अपहारातील वाढलेला गुंता सीसी टीव्हीमुळे सुटला. तहसीलदार पाटील यांनी ज्या तारखेला धनादेश वटवले त्यावेळची चित्रफीत पाहिली. त्यातील एक संशयीत व्यक्ती बॅंकेचे कॅशियर यांनी दाखवली. तीच व्यक्ती नेहमी तहसीलदार यांच्या सहीच्या चेकने पैसे काढत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती महेश श्रीबास असल्याचे एका महसूल कर्मचाऱ्याने ओळखले.

आज श्रीबास राजीनामा देण्याच्या उद्देशाने आला होता. या वेळी पाटील यांनी बॅंकेचे कॅशियर साबळे यांना श्रीबास यांना दाखवले असता, त्यांनी हीच व्यक्ती पैसे काढणारी असल्याचे सांगितले व व्ही. बी. कानडेचे दुसरे रूप उघड झाले. गौण खनिज विभागाचे चेक बुक पवार यांच्याच ताब्यात असल्याने, तसेच बॅंकेला दिलेल्या प्राधिकार पत्रांचे जावक क्रमांक कार्यालयातील कागदपत्रांशी जुळत नसल्याने पवार व श्रीबास यांनी संगनमताने अपहार केल्याची फिर्याद पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अशोक आमले करीत असून, श्रीबास याला अटक केली आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी पी. अन्बलगन यांनी आज दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयास भेट देऊन माहिती घेतली व कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामुळे तहसील कार्यालयाची हिशेब तपासणी सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या "नार्को' आवश्‍यक
या कर्मचाऱ्यांची नार्को चाचणी केली, तर या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे दुवे, तसेच मदत करणारांची नावे उघड होतील, अशी चर्चा तहसीलच्या आवारात जमलेल्या काही नागरिकांत होती. http://72.78.249.124/esakal/20091231/5560562159010555762.htm
-------------------------------------------------------
Learning - All Revenue officers need to be alert all the time

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...